संपूर्ण नव्या स्वरूपात विशेष आ‍वृत्ती
अभिजित प्रकाशन
फ़्लॅट नं. ३०१, तिसरा मजला, एन. के. विथिका,१०४७,सदाशिव पेठ, रहाळकर राम मंदिरासमोर पुणे - ४११ ०३०.
फोन नं.:०२०-२४४९७७४८, ९८२२३७८२६७
ई-मेल:

जीवनपट ग्रंथसूची छायाचित्रे
जन्म : ११ ऑगस्ट १९२८, पुणे
प्राथमिक शिक्षण : मुंबई
माध्यमिक शिक्षण : पुणे - पेरुगेट भावेस्कूल
महाविद्यालयीन शिक्षण : बृहन्‌ महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज
विद्यार्थिदशेत नोकरी : नथूराम गोडसे यांच्या ‘अग्रणी’ मध्ये
रा. स्व. संघाच्या सत्याग्रहात भाग व त्यामुळे तीन महिने तुरुंगवास : १९४८
प्रभात, ज्ञानप्रकाश, लोकशक्ती वगैरे वर्तमानपत्रांत नोकरी : १९५० ते १९५४
आल्हादचित्र या कै. दत्ता धर्माधिकारी यांच्या चित्रपटसंस्थेत प्रसिद्धि-प्रमुख : १९५४ ते १९५७
विवाह : ९ फेब्रुवारी १९५७
मुंबई येथील ‘साराभाई अ‍ॅडव्हर्टायझिंग’ कंपनीत नोकरी : १९५७ ते १९६२
दै. केसरीच्या रविवारच्या आवृत्तीचे संपादक : १९६७
लंडन येथील ‘टॉमसन फौंडेशन’ या संस्थेच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी परदेशगमन : जानेवारी ते मे १९६५
बी. ए. ऑनर्स पदवी संपादन : १९६७
प्रकाशित झालेले पहिले पुस्तक - आज इथे उद्या तिथे : १९६७
‘व्होल्गा जेव्हा लाल होते’ या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक : १९७०
पुणे येथील ‘सिम्बायोसिस’ या संस्थेच्या स्थापनेत महत्वाचा सहभाग : १९७१
दै. केसरीचा राजीनामा : १९७८
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन’ या संस्थेत प्रकाशन-विभाग प्रमुख : १९७८ ते १९८३
कै. ग. वा. बेहेरे यांच्या ‘सोबत’ साप्ताहिकाचे संपादक : १९८९
पुणे येथील ‘सिम्बायोसिस’ या संस्थेच्या कार्यकारिणीचे सभासद : १९८६ पासून अखेरपर्यंत
‘नेताजी’ या ग्रंथास मुंबई येथील मारवाडी संमेलनाचा पुरस्कार : १९९१
महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक : १९९२ ते १९९४
‘१९४७’ या ग्रंथास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा द. वा. पोतदार पुरस्कार : १९९४
पुणे येथील श्रमिक पत्रकार संघातर्फे ‘ज्येष्ठ पत्रकार’ म्हणून गौरव : १९९७
‘नेताजी’ ग्रंथास मुंबईच्या ‘नेताजी मेमोरियल ट्रस्ट’ या संस्थेचा पुरस्कार : १९९७
‘सत्तावन्न ते सत्तेचाळीस’ या ग्रंथास न. चिं. केळकर पुरस्कार : १९९७
‘सत्तावन्न ते सत्तेचाळीस’ या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार : १९९७
‘वाळिंबे कुलवृत्तान्त’ समितीचे संस्थापक - अध्यक्ष : १९९८
‘स्वातंत्र्य संग्राम : ज्ञात आणि अज्ञात’ या ग्रंथास साहित्य परिषदेचा शं. ना. जोशी पुरस्कार : १९९८
‘आपला स्वातंत्र्यलढा’ या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा बालवाङ्‌मय पुरस्कार : १९९९
मृत्यू : २२ फेब्रुवारी २०००
   
 
Site Designed by Brainlines