संपूर्ण नव्या स्वरूपात विशेष आ‍वृत्ती
अभिजित प्रकाशन
फ़्लॅट नं. ३०१, तिसरा मजला, एन. के. विथिका,१०४७,सदाशिव पेठ, रहाळकर राम मंदिरासमोर पुणे - ४११ ०३०.
फोन नं.:०२०-२४४९७७४८, ९८२२३७८२६७
ई-मेल:

 

वारसा पित्याचा !

प्रख्यात साहित्यिक वि. स. वाळिंबे यांचा मुलगा अभिजित वाळिंबे यांची ही प्रकाशन संस्था!
१९६५-६६ च्या सुमारास वि. स. वाळिंबे यांनी "गरुडझेप" व "वज्रप्रहार" ही स्वतःची दोन पुस्तके प्रकाशित करुन "अभिजित प्रकाशना"ची मुहुर्तमेढ रोवली.

वि. स. वाळिंबे यांचे निधन झाल्यावर वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ काय करता येईल असा विचार करताना अभिजितना त्यांच्यावरील स्मृतीग्रंथाची कल्पना सुचली. कारण पुस्तकापेक्षा वेगळी अशी बाब त्यांना आवडलीच नसती.या विचाराने झपाटल्यावर, अभिजितने "उमदा लेखक, उमदा माणूस" या वडिलांसंबंधी लिहिलेल्या आठवणींचं पुस्तक प्रसिध्द केलं. या पुस्तकाने "अभिजित प्रकाशनाची"
पुनश्च सुरुवात झाली.

संग्राह्य आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणारी संस्था असा नावलौकिक "अभिजित प्रकाशन"ने अल्पावधीतच प्राप्त केला आहे.

प्रस्थापित लेखकांबरोबरच गुणवान नवोदित लेखकांचे साहित्य प्रकाशित करण्याचे "अभिजित प्रकाशना"चे धोरण आहे. एकाच प्रकारची पुस्तके प्रकाशित न करता विषयाचे वैविध्य जपण्याचे "अभिजित प्रकाशना"चे उद्दिष्ट आहे.

आता "अभिजित प्रकाशना"ने दर्जेदार अनुवादित पुस्तके प्रकाशित करण्याच्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

इंग्लिश / इंग्रजी पुस्तकांबरोबरच भारतीय भाषांमधील पुस्तकांचे अनुवाद प्रकाशित करण्याचा "अभिजित प्रकाशना"चा संकल्प आहे.

 

 
Site Designed by Brainlines